शहरातील जोशी गल्ली येथे टेंबे गणपतीची स्थापना शनिवारी केली जाणार असून बुधवार, दिनांक १८ सप्टेंबर रोजी श्रींचे विसर्जन होणार आहे पाच दिवस विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत भाविक भक्तांना दर्शन सुलभ व्हावे याकरिता मंडळाचे सदस्य यांनी यंत्रणा कार्यान्वित केले आहे. टेंबे गणपती स्थापनेपूर्वी शहरातून ढोल ताशाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. इको फ्रेंडली मूर्ती अजिंक्य देशमुख, शंतनू जोशी, उदय जोशी, गौरव मुळे, निखिल मुळे यांनी केले असून मूर्तीचे रंगकाम व सजावट गणेश बागडे यांनी केले आहे. मंडळाचे हे १२४ वे वर्ष असल्याची माहिती गणेश मुळे यांनी दिली आहे.




Comment here