वर्तमान विषयी...
वर्तमान माध्यम समुहाचा जन्मच सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून झाला आहे. समाजातील विविध घटकांना जोडून सकारात्मक वार्तांकन करण्याच्या हेतूने 'वर्तमान' एक एक पाऊल पुढे टाकत आहे. त्याचेच 'वर्तमान' प्रतिबिंब हे प्रतीक आहे. ते प्रारंभ करताना मनस्वी आनंद होतोय. समाजातील बदल, विकासात्मक पत्रकारिता हा वर्तमान प्रतिबिंबचा गाभा असेल. यात विविध पातळीवर होत असलेले सकारात्मक प्रयोग 'प्रतिबिंब'च्या ऐरणीवर असतील. समाजोपयोगी सकस माहिती देण्यासाठी आमची टीम बांधील आहे. वेगळेपणाने लिहिणाऱ्या नामांकित पत्रकार, लेखकांसह नवोदित साहित्यिक, पत्रकारांना हक्काचे स्थान 'प्रतिबिंब'मध्ये असेल. 'वर्तमान प्रतिबिंब' हे नवसमाजनिर्मितीसाठी उचललेले एक विधायक पाऊल असेल. आधुनिक विचारांचे वर्तमानचे धाकटे भावंड म्हणून वर्तमान प्रतिबिंबही 'आपले वृत्तपत्र, आपला आवाज' या ब्रिद वाक्यानुसार कार्यरत राहिल, ही ग्वाही देताना सहयोगासाठी आपण 'वर्तमान प्रतिबिंब'शी कनेक्ट राहाल,ही अपेक्षा .