आपला जिल्हा

‘तुळजाभवानी’चा 700 कोटींचा टप्पा अभिमानास्पद : चंद्रकांत शेजुळ

माजलगाव : सहकार क्षेत्रात विकासाचा चढता आलेख निर्माण करणाऱ्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटने यंदा आपल्या व्यवसायाचा तब्बल 700 कोटींचा टप्पा पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यात 418 कोटींच्या ठेवी तर 286 कोटींचे कर्ज वितरण असा समावेश आहे. दरम्यान, तुळजाभवानी अर्बनने 700 कोटींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ म्हणाले, तुळजाभवानी अर्बनचे हे यश सहकार क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहेच तर माझ्यासह सर्व टीमचा उत्साह वाढवणारे आहे. या सर्व यशाचे श्रेय आमच्यावर विश्वास टाकणारा ग्राहक आणि माझ्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या टीमला देतो.

Comment here