प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठाणतर्फे आयोजन
माजलगाव : श्रीरामनवमीनिमित्त जुना मोंढा येथील गणपती मंदीरात दि.१० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे, अशी माहिती संयोजक तथा प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष किशोर कानडे यांनी दिली.
श्रीरामनवमीनिमित्त दरवर्षी प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठाणच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाही श्रीरामनवमीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सामाजिक बांधीलकी जपावी. आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो, या भावनेतून रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन महायज्ञात सामील व्हावे. इच्छुक रक्तदात्यांनी 9168385555 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन दीपक तोडकरी, शुक्लेश्वर धारक यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comment here