आपला जिल्हा

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगावमध्ये आज रक्तदान शिबिर 

माजलगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवारी दि. १४ जून मंगळवार रोजी येथील वैष्णवी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन
सकाळी ९:०० ते  दुपारी ४:०० वाजेपर्यंत केले आहे,अशी माहिती संयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजलगाव च्या वतीने पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव शहरातील झेंडा चौकातील हानुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन दि १४ जुन मंगळवार रोजी सकाळी आयोजन करण्यात आले असुन त्यानंतर येथील वैष्णवी मंगल कार्यालयात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ असून यातून रक्ताचे नाते जोडूया, असे आवाहन करत रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी ९:०० ते दुपारी ४:०९ वाजेपर्यंत आयोजित केले आहे, तरी महाआरती व रक्तदान शिबीरात माजलगाव शहर आणि तालुक्यातील युवक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजलगावच्या वतीने करण्यात आले आहे.

Comment here