संयोजक गोविंदभैय्या केकान यांची महिती; सोहळ्याचा खर्च पाणी टंचाई निवारणासाठी
बीड : मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात पावसाने डोळे वटारल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा भूमिपुत्रांचा सन्मान हा राज्यपातळीवरील सोहळा रद्द करण्यात आला असून भविष्यात जर पाण्याची अधिक टंचाई निर्माण झाली तर परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा मोफत देण्यासाठी हा कार्यक्रमाचा निधी वापरू, अशी माहिती सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जी.के.फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष तथा यशस्वी युवा उद्योजक गोविंदभैय्या केकान यांनी दिली.
बीड जिल्हयातील धारुर तालुक्यातील चाटगाव येथील भूमिपुत्र तथा सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जी.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोविंदभैय्या केकान यांचा ३० ऑगस्ट हा वाढदिवस. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. गेल्या वर्षापासून जी.के.फाउंडेशनच्या वतीने राज्य पातळीवरील भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत आहे. मात्र यंदा मराठवाडा, बीड जिल्ह्यावर दुष्काळ सदृश्य परिस्थिती ओढवली आहे. या धर्तीवर भव्य दिव्य स्वरूपात वाढदिवस साजरा न करण्याचा गोविंदभैय्या यांनी घेतलेला आहे. हा निर्णय केवळ कौतुकास्पदच नाही तर इतर नेत्यांनीही यातून आदर्श घेण्यासारखा आहे, अशा प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांना व्यक्त केल्या आहेत. सामाजिक भान जपत रद्द केलेला वाढदिवसाचा निधी भविष्यात जर पाण्याची अधिक टंचाई निर्माण झाली तर परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा मोफत देण्यासाठी वापरू, ही केलेली घोषणा नोंद घेण्यासारखी आहे. सामाजिक भान जपणारी आहे त्यामुळे गोविंदभैय्या केकान यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comment here