आपला जिल्हा

रूग्णांच्या मदतीला धाऊन जाणारे महादेव मातकर

बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीडमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम जोमात सुरू

बीड : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बीड जिल्हा कक्षप्रमुख महादेव मातकर हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत असतात. बीड तालुक्यातील गुंदा वडगाव येथील महादेव नागरगोजे यांना तातडीने उपचार मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे.

युवा उद्योजक तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव मातकर हे आरोग्य सेवेत कार्य करत आहेत. मातकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. महादेव मातकर यांच्या प्रयत्नांमुळे अनेक रूग्णांना जीवदान मिळाले आहे. नुकतेच बीड तालुक्यातील गुंदा वडगाव येथील महादेव नागरगोजे यांना फिट्स आले होते. प्रसंगावधान राखून बीड येथील शासकीय रूग्णालयात हलविले. त्यानंतर डॉक्टरांनी योग्य उपचार केले. आता त्यांची तब्येत ठणठणीत झाली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातून गरजू आणि गरीबांना मदतीचा हात मिळत आहे. गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील छत्रभुज मोरे यांच्या हर्निया ऑपरेशनसाठी मदत करण्यास आली. ताडसोन्ना येथील नवनाथ कोंडिबा माने यांना पायाच्या ऑपरेशनसाठी वैद्यकीय मदत करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील गरजूंना बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव वैद्यकीय मदत मिळत असल्याची माहिती महादेव मातकर यांनी दिली.

Comment here