येत्या 9 जानेवारीला मुंबई येथे होणार जाहीर प्रवेश; बाजीराव चव्हाण यांची राहणार उपस्थिती
बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामान्य लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना व निर्णय घेण्याच्या क्षमते मुळे भविष्यात सामान्य लोकांसाठी काम करण्याची संधी मिळेल या विश्वासावर बीडचा ढाण्या वाघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा 9 जानेवारी रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार आहे. या जाहीर प्रवेशासाठी बीडमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आरोग्यदूत म्हणून प्रसिद्ध असणारे बाजीराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश होत असलेल्या अनिल दादा जगताप यांचा बाजीराव चव्हाण यांनी मनस्वी सत्कार केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख मुरब्बी राजकीय नेते, अनिल दादा जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची दखल घेत शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल जगताप यांच्या निर्णयामुळे त्यांच्या पाठीशी असणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू व आरोग्य दूत म्हणून महाराष्ट्र भर रुग्णांच्या सेवेत अहोरात्र झटणारे बाजीराव चव्हाण यांनी अनिलदादा जगताप यांचे पक्ष प्रवेश पूर्वी सत्कार केला असून अनिल दादा जगताप यांच्या समवेत 9 जानेवारीला होणाऱ्या जाहीर प्रवेशात बाजीराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Comment here