बीडच्या रेल्वेचे स्वप्न लवकरच साकारणार : माजी आमदार डि.के.देशमुख
माजलगाव : बीड-परळी-नगर रेल्वेप्रश्नासाठी पत्रकार व मराठवाडा जनता विकास परिषदेने मोठा लढा दिला असुन या लढ्याला यश आले असुन बीडच्या रेल्वेचे स्वप्न लवकरच साकारणार असल्याचे माजी शिक्षक आमदार डि.के.देशमुख यांनी सांगितले.
माजलगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज रविवार, दि.7 जानेवारी रोजी वैष्णवी मंगल कार्यालयात रविवारी दर्पण व विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मरावाठवाडा गीत धनंजय जाडे, अॅड.सुबोध देशपांडे यांनी सादर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर हे तर लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखान्याचे अध्यक्ष विरेंद्र सोळंके, माजी आमदार मोहनराव सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, भाजपा नेते रमेश आडसकर, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे, माजी नगराध्यक्ष शेख मंजुर, बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, राहुल जगताप, सत्कारमुर्ती अमरनाथ खुर्पे, डि.के.देशमुख, एकनाथ गोपाळ, गोविंद गरड यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना देशमुख म्हणाले की, नितीमुल्ये पाळल्यास प्रत्येक व्यक्ती ज्या त्या क्षेत्रात यशस्वी होतो. बीड नगर परळी रेल्वेचा प्रश्न लवकरच साकार होणार असुन रेल्वेत बसण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगीतले. यावेळी बोलतांना माजी आमदार मोहनराव सोळंके म्हणाले की, मतदारसंघामध्ये ग्रामीण भागात रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असुन विविध समस्या मांडण्याचे काम येथील पत्रकार करतात. माजलगावचे पत्रकार सकारात्मक पत्रकारिता करतात तर माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील म्हणाले की, माजलगाव पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनिय व कौतुकास्पद आहे. मागील चौदा वर्षांपासुन विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देउन त्यांचा गौरव करतात. विवीध प्रश्न मार्गी लागावेत याकरीता राजकीय नेत्यांनी आंदोलने करणे गरजेचे आहे परंतु मागील अनेक वर्षांपासुन असे दिसत नाही तर येथील पत्रकारच विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी सांगीतले. आपल्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा असुन मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी येथील पत्रकार कायम प्रयत्नशिल असल्याचे भाजपा नेते रमेश आडसकर यांनी सांगितले. सोळंके कुटूंबीय पत्रकारांच्या कार्यामध्ये कायम सहभागी असल्याचे विरेंद्र सोळंके यांनी सांगीतले. अध्यक्षीय समारोपात उमेश मोगरेकर म्हणाले की, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकार जागल्याची भुमिका बजावतात तर समाजातील योग्य व्यक्तींना पुरस्कार देउन त्यांच्या कार्याची दखल पत्रकार संघ घेत असल्याचे सांगीतले. यावेळी अच्युत लाटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजलगाव पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार अमरनाथ खुर्पे यांना तर माजी शिक्षक आमदार डि.के.देशमुख यांना मराठवाडा भुषण पुरस्कार तर विनोद गोपाळ, गोविंद गरड यांना यशस्वी उद्योजक म्हणुन पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रास्ताविक तुकाराम येवले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ.रमेश गटकळ यांनी तर आभार कमलेश जाब्रस यांनी मानले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना अमरनाथ खुर्पे म्हणाले की, 19 वर्षे केलेल्या पत्रकारितेची दखल घेउन पत्रकार संघाने दिलेला दर्पण पुरस्कार हा निश्चीतच प्रेरणादायी राहिल. यावेळी बोलतांना यशस्वी उद्योजक एकनाथ गोपाळ म्हणाले की, माजलगाव सारख्या ग्रामीण भागातुन आज माजलगावकरांच्या प्रेमामुळेच यशस्वी होवु शकलो आज पत्रकार संघाने दिलेला पुरस्कार हा आपल्या मातीतुन दिलेला पुरस्कार असुन देश-विदेशात धपाटे पोहंचवण्यासाठी निश्चीतच उपयोगी ठरेल. यावेळी अमरनाथ खुर्पे, एकनाथ गोपाळ, गोविंद गरड यांचा सपत्नीक मानपत्र, सन्मानचिन्ह, साडीचोळी, फेटा, पुष्पहार देउन गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र मस्के, दिनकर शिंदे, दत्ता येवले, अरविंद ओव्हाळ, संतोष मुळी, राज गायकवाड, कुणाल दुगड, धनंजय माने, सातत्य ग्रुप यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास शहरातील विवीध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रााष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comment here