आपला जिल्हा

ज्येष्ठ पत्रकार बाबा देशमाने यांना पितृशोक

बीड : मौजे चाटगाव, ता.धारूर येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीहरी संतोबा देशमाने (वय ७०) यांचे मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. परिसरात अतिशय मनमिळाऊ आणि प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुंबई येथून प्रसिद्ध होत असलेल्या आरोग्यदूत मासिकाचे संपादक बाबा देशमाने यांचे ते वडील होते. देशमाने परिवारावर कोसळलेल्या दुखाःत वर्तमान माध्यम समूह सहभागी आहे.

Comment here