आपला जिल्हा

‘आम्ही आपल्या सोबत आहोत..’

जयसिंह सोळंके यांचा पूरग्रस्तांना दिलासा; पूरग्रस्त भागाची केली पाहणी

माजलगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंह सोळंके यांनी माजलगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून आम्ही आपल्या सोबत आहोत असे म्हणत पूरग्रस्तांना दिलासा दिला तर तात्काळ नुकसान-भरपाई देण्यासाठी शासनस्तरावर माहिती देण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

माजलगाव तालुक्यात पुरस्थितीमुळे पुरुषोत्तमपुरी, सादोळा, देपेगाव, आबुजवाडी, मंजरथ, सांडस चिंचोली, सुरूमगाव, गंगामसला, सोन्नाथडी या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. या भागांची प्रत्यक्ष पाहणी युवा नेते जयसिंह सोळंके यांनी करत पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आम्ही सातत्याने प्रशासनाशी संपर्क साधत आहोत.आपत्कालीन काळात नागरिकांना आवश्यक मदत मिळावी यासाठी सर्व यंत्रणा उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्नशील असून नागरिकांनी कोणत्याही अडचणीसाठी किंवा आपत्कालीन गरजांसाठी संपर्क साधावा. पूरपरिस्थितीची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली असल्याचे सांगत आम्ही आपल्या सोबत आहोत असे म्हणत पूरग्रस्तांना जयसिंह सोळंके यांनी दिलासा दिला आहे.

Comment here