आपला जिल्हा

जयसिंह सोळंके यांची बाबा देशमाने यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

माजलगाव : बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जयसिंह सोळंके यांनी आज ज्येष्ठ पत्रकार बाबा देशमाने यांच्या चाटगाव येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.

मुंबई येथून प्रसिद्ध होणाऱ्या आरोग्यदूतचे संपादक बाबा देशमाने यांचे वडील श्रीहरी देशमाने यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. त्यानुषंगाने देशमाने परिवाराचे सांत्वन करण्यासाठी जयसिंह सोळंके यांनी भेट दिली. यावेळी माजी सरपंच बालासाहेब केकान यांची उपस्थिती होती. श्रीहरी देशमाने हे पंचक्रोशीत अतिशय विनम्र आणि प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते, दिवंगत श्रीहरी देशमाने यांनी आपल्या जीवनात देशमाने कुटुंबाला आदर्श संस्कार दिले, त्याचा वारसा पुढे सक्षम चालविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया जयसिंह सोळंके दिली. लढा दुष्काळाशी चळवळीचे प्रणेते ॲड.राज पाटील, पिंपरखेडचे माजी सरपंच अशोक निपटे, सुरेश माने, जेष्ठ पत्रकार सुभाष नाखलगावकर, एकनाथ मस्के, राज गायकवाड, ग्रामसेवक बालाजी दोडके यांनी निवासस्थानी भेट देऊन देशमाने परिवाराचे सांत्वन केले.

Comment here