भव्य शोभायात्रा व २ दिवस एक हजार महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत विधी
माजलगाव : श्री बालाजी मंदिर येथे चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त ब्रम्होत्सव, श्री सहस्त्र कलशाभिषेकाचे आयोजन बालाजी सेवा फाऊंडेशनच्या वतीने भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या दिनांक ४, ५ आणि ६ आॅक्टोबर रोजी तीन दिवशीय उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यात हा ब्रम्होत्सवानिमित्त मंत्र पुष्पांजलीसह, अर्चना पूजन होणार असून हा कार्यक्रम अत्यंत मोठ्या स्वरूपात होत आहे. शनिवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी शहरातील झेंडा चौक येथून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री बालाजी मंदिर असे भव्य शोभायात्राचे आयोजन केले आहे. या शोभायात्रेत हजारो भाविकभक्त परिवाराचा सहभाग राहणार आहे. तसेच या दिवशी श्री सहस्त्र कलाशाभिषेक विधी प्रथम दिवशी सकाळी ९ वाजता होईल. श्री बालाजी सेवा फाऊंडेशन च्या वतीने करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेस १००० महिलांच्या हस्ते विषुसहस्त्रनाम व व्यंकटेश स्तोत्राचे पठण होईल. सकाळी ९ वाजता स्थापित देवता पूजन, शांती होम, पूर्णाहुती विष्णु सहस्त्रनाम जप व कलशाभिमंत्रण होईल. सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री भगवान व्यंकटेशास सहस्त्र कलशाभिषेक, त्रिशोपचार महापूजन, ध्वजारोहण, नैवेद्य महाआरती व महाप्रसादाचे आयोजन सायंकाळी ६ वाजता करण्यात आले. आहे. महाप्रसादाचे यजमान रामस्वरूप खंडेलवाल व कारभारी काळे हे आहेत या प्रसादाचा व त्रिदिवशी कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन श्री बालाजी सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.



Comment here