माजलगाव : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांना पदवीधर मतदारांनी पसंती क्रमांक १ चे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांचे सहकारी निळकंठ साबळे यांनी केले. गेल्या तीन टर्ममध्ये पदवीधरांचे नेतृत्व करताना चव्हाण यांनी शैक्षणिक क्षेत्रासह मराठवाड्याच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला असून, यावेळी ते विजयाचा चौकार मारतील, असा विश्वासही साबळे यांनी व्यक्त केला.
माजलगाव तालुक्यासह मराठवाड्यातील विद्यार्थी, पदवीधर आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांसाठी आमदार सतीश चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना आवश्यक ते सहकार्य करण्यापासून ते शैक्षणिक क्षेत्रातील मूलभूत प्रश्न शासनदरबारी मांडण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ‘सतीश चव्हाण यांनी काय केले?’ असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांनी आपल्या कामातूनच ठोस उत्तर दिले आहे, असे निळकंठ साबळे यांनी सांगितले.
अठरा वर्षांच्या नेतृत्वाचा अनुभव
मागील तीन टर्म म्हणजेच तब्बल अठरा वर्षे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना सतीश चव्हाण यांनी मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. पदवीधर, विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला. विधी क्षेत्रातील विविध प्रश्नांनाही त्यांनी विधिमंडळात वाचा फोडली. आगामी काळातही पदवीधरांच्या प्रश्नांसाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास साबळे यांनी व्यक्त केला.
विविध क्षेत्रांतील प्रश्नांसाठी पाठपुरावा
प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, युवक, महिला यांच्यासह शिक्षण, सामाजिक क्षेत्र, उद्योग, कृषी, आरोग्य आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील ज्वलंत प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देत ते मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यातील अनेक प्रश्न सोडविण्यात यश आले असून, त्याचे पदवीधर आणि नागरिक साक्षीदार आहेत. अद्याप काही प्रश्न शासनदरबारी प्रलंबित असून, त्याचीही आमदार सतीश चव्हाण यांना पूर्ण जाणीव आहे, असे निळकंठ साबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
‘पसंती क्रमांक १’ देण्याचे आवाहन
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. या निवडणुकीत मराठवाड्यातील पदवीधरांनी लोकशाही मार्गाने आपला प्रतिनिधी पुन्हा विधिमंडळात पाठवावा आणि आमदार सतीश चव्हाण यांना पसंती क्रमांक १ चे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन निळकंठ साबळे यांनी केले. “पदवीधरांचा विश्वास, अठरा वर्षांची कामगिरी आणि सातत्याने प्रश्न मांडण्याची भूमिका यामुळे यंदाही सतीश चव्हाण यांनाच पदवीधरांची पहिली पसंती मिळेल आणि ते विजयाचा चौकार मारतील,” असा विश्वास साबळे यांनी व्यक्त केला.
निळकंठ साबळे



Comment here