महा-राष्ट्र

लढा दुष्काळाशी चळवळीतर्फे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सन्मान

बीड : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पूरग्रस्त भागात जे काम केले आहे त्याला तोड नाही. त्यानुषंगाने लढा दुष्काळाशी चळवळीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सामान्य माणसांशी थेट कनेक्ट खासदार अशी देशभर ख्याती असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पूरग्रस्त भागात जे काम केले त्याला तोड नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देत मदत केली. त्यानुषंगाने लढा दुष्काळाशी चळवळीचे प्रणेते ॲड.राज पाटील यांनी आज धाराशिव येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा रोपटे आणि संत तुकाराम महाराज यांची गाथा भेट देऊन सन्मान केला. यावेळी मुंबईच्या आरोग्यदूतचे संपादक बाबा देशमाने, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब खंदारे, पत्रकार अशोक फपाळ, अभियंता निखील वीर आदींची उपस्थिती होती.

ओमराजे निंबाळकर यांचा इतर राजकारण्यांनी आदर्श घ्यावा: ॲड.राज पाटील 

राजकारणलीकडे जाऊन धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल आठ दिवस पूरग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांना मदत केली. दुःखितांची आसवे पुसली. इतर राजकारणी आलिशान गाडी, विमानातून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. ओमराजे निंबाळकर यांचा आदर्श इतर राजकारण्यांनी घेण्याची गरज असल्याचे ॲड.राज पाटील यांनी सांगितले.

Comment here