माजलगाव : तालुक्यातील सुरूमगाव येथे अतिवृष्टी व महापूर अशा दुहेरी तडाख्यात सापडलेल्या पूरग्रस्तांना मराठा सेवा संघाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे माजलगाव तालुक्यातील सुरूमगाव या गावाचा जनसंपर्क तुटला होता. सध्या महापुराचे पाणी ओसरत आहे, परंतु येथील नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी मराठा सेवा संघ, बीड यांनी पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरूमगाव या ठिकाणी केले. यावेळी विभागीय अध्यक्ष अशोकराव ठाकरे, बीड जिल्हाध्यक्ष धनंजय शेंडगे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर, विभागीय सचिव मधुकर शेळके, वारकरी परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष संतोष डोंगरे, किरण सावंत, मधुकर नवले, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण यादव, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे सचिव आनंदकुमार सिरसट यांसह गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.



Comment here