आपला जिल्हा

राजेगावात पूरग्रस्तांसाठी मोफत आरोग्य शिबीर; उपचार सेवा

देशपांडे हाॅस्पिटलचा स्तुत्य उपक्रम 

माजलगाव : पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर तालुक्यातील राजेगाव येथे बुधवारी, दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १ वाजेच्या दरम्यान घेण्यात आले. डॉ.श्रेयश देशपांडे यांच्या पुढाकारातून पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा पुढे करून यावेळी पूरग्रस्त नागरिकांची मोफत उपचार सेवा करण्यात आली.

पुरामुळे माजलगाव तालुक्यातील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक नागरिकांना आपली गावे सोडून स्थलांतरित होवू लागले आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची आरोग्याची दैना होऊ लागली आहे. पुराच्या पाण्यामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाला आहे. अशा स्थितीत सामाजिक दायित्वाच्या भावनेतून माजलगाव येथील डॉ.श्रेयश देशपांडे यांनी देशपांडे हार्ट केअर हॉस्पिटल मार्फत एक हात मदतीचा पुढे करत राजेगाव येथे बुधवारी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान मोफत आरोग्य शिबिर उपचार सेवा दिली. यावेळी पुरामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची १४० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात १४ रूग्णांचे इसीसी, ४० रूग्णांचे बीएसएल करण्यात आले. त्यांना आरोग्य विषयक जागरूक राहण्याचा सल्ला दिला. यावेळी तीन डॉक्टर, टेक्निशियन टीम, लॅब असिस्टंट, सर्व नर्सिंग स्टॉप, दरम्यान डॉ.श्रेयश देशपांडे यांच्या पूरग्रस्तांसाठी पुढे केलेल्या एक हात मदतीने मोठा दिलासा मिळत आहे.

Comment here