आपला जिल्हा

माजलगाव नगरपरिषद सदस्यपदांची आरक्षण सोडत जाहीर

अनेक इच्छुकांना संधी; दिग्गजांना फटका

माजलगाव : माजलगाव नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी २६ सदस्यपदांची आरक्षण सोडत आज प्राधिकृत अधिकारी म्हणून तहसिलदार संतोष रूईकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगरपरिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. या सोडतीमुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, अनेक इच्छुकांना संधी मिळाली आहे, तर काहींना आरक्षित जागेमुळे फटका बसला आहे.

यावेळी माजलगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पोपट निगळ यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपरिषदेच्या एकूण ४९,४५३ लोकसंख्येनुसार, १३ प्रभागांमधून २६ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ३ जागा (राखीव २ महिला), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ७ जागा (राखीव ४ महिला) आणि एकूण १३ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

माजलगाव नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे :

प्रभाग क्र.१ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.२ : (अ) अनुसूचित जाती महिला, (ब)सर्वसाधारण

प्रभाग क्र.३ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र.४ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र.५ : (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.६ : (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.७ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.८ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.९ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र.१० : (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.११ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.१२ : (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र.१३ : (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला

नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्ग महिलेला आरक्षित झाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. आता सदस्यपदांचे आरक्षणही जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष अंतिम मोर्चेबांधणीला लागले आहेत.

Comment here