आपला जिल्हा

पूरग्रस्तांना श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा मदतीचा हात

माजलगाव : तालुक्यातील पूरग्रस्तांना अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील पिठाधीश परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने गुरूपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे मदत देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी व सिंधफणा नदीच्या काठावर असलेल्या गावांना पुराचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला अनेक कुटुंबांची आर्थिक स्वरूपात नुकसान झाले. अशावेळी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील पिठाधीश परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने गुरूपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी, मंजरथ, देपेगाव , सांडस चिंचोली, आळसेवाडी, गंगामसला येथील पुरग्रस्थांना किराणा किट्स, साड्या, ब्लॅंकेट इतर जीवनावश्यक वस्तू देऊन मदत करण्यात आली या स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रमांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल तसेच बीड जिल्हा मराठी पत्रकार संघानेही आपले योगदान दिले. यावेळी मंडळ अधिकारी सोपान सोनवणे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.शामसुंदर काकाणी, डॉ.शिवाजीराव काकडे, डॉ.यशवंत राजेभोसले, डॉ.अशोक घुबडे, डॉ.अभिजित सोळंके, रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रलचे पांडुरंग चांडक, मराठी पत्रकार संघाचे हरिष यादव, पांडुरंग उगले, सावंत तसेच सर्व पत्रकार बांधव, माजलगाव तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी उपस्थित होते.

Comment here