आपला जिल्हा

माजलगावात चैतन्य महाराज देगलूरकर यांची तीन दिवसीय प्रवचनमाला

माजलगाव : प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संत धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान माजलगाव आणि राजस्थानी सेवा समाज माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन माजलगाव येथे करण्यात आले आहे.

हे प्रवचन मालेचे १६ वे वर्षे आहे. तर प्रवचनाचा विषय हरिपाठ हा असून या अमृतमय प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संतधुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान व राजस्थानी सेवा समाज माजलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. फाल्गुन शुद्ध १ ते फाल्गुन शुद्ध ३ बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेमध्ये राजस्थानी मंगल कार्यालय माजलगाव येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ या विषयावर प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comment here