माजलगाव : जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सातकर्णी युवक संघ, माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मप्रचारक, बौद्धाचार्य व समता सैनिकांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता श्रावस्ती बौद्ध विहार, केसापुरी कॅम्प, माजलगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सद्धम्माचा आदर्श घराघरात आणि मनामनात पोहोचवण्यासाठी अविरत कार्य करणाऱ्या आंबेडकरी धम्म योद्ध्यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील सक्रिय बौद्ध विहार, धम्मप्रचारक, बौद्धाचार्य तसेच समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा जाहीर सत्कार या कार्यक्रमात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयु.भास्करराव भोजने (अध्यक्ष, विद्वत सभा, महाराष्ट्र राज्य, अकोला) उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून प्रा.श्रीकिशन मोरे (सहयोगी प्राध्यापक, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर) मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदीप भोगले (सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, बीड) यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून भारत तांगडे (संस्थापक, जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड) कार्यभार सांभाळणार आहेत. या गौरव सोहळ्यास बीड जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सातकर्णी युवक संघाचे आयु.रविकांत उघडे, आयु.बाबासाहेब जाधव, आयु. अशोक कांबळे, आयु.संपादक सुहास बोराडे, आयु.लक्ष्मण जाधव व आयु. इंजि.बिभीषण उघडे यांनी केले आहे.



Comment here