माजलगाव : सद्गगुरू श्री मिस्कीन स्वामी मठाचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या पंचम तपोनुष्ठानाची सांगता श्रावण वद्य अमावस्या, शुक्रवार दि.११ सप्टेंबर २०२६ रोजी गंगामसला येथील संस्थान मठाच्या शेतामध्ये होणार आहे. या निमित्ताने आयोजित महापूजा व तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थान मठाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या पंचम अनुष्ठानास श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १९४८, गुरूवार दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारंभ झाला. श्रावणमासाच्या पावन पर्वात सुरू असलेल्या या तपोनुष्ठानाची सांगता शुक्रवार दि.११ सप्टेंबर रोजी होणार आहे.
गंगामसला येथील संस्थान मठाच्या शेतामध्ये तपोनुष्ठान समाप्तीनिमित्त महापूजा व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक सोहळ्यास परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या सर्व सद्भक्तांनी उपस्थित राहून श्रीगुरूंचे दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच तपोनुष्ठान समाप्तीनंतर श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे माजलगाव येथील संस्थान मठात सायंकाळी ६ वाजता आगमन होणार आहे. त्यावेळीही सर्व भक्तांनी संस्थान मठात उपस्थित राहून श्रीगुरूंचे दर्शन घ्यावे, असे कळविण्यात आले आहे. दरम्यान, श्री पार्वतीमाता अन्नछत्र, कपिलधार येथील सेवा नित्य सुरू असून भाविकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. या संपूर्ण धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थान मठाच्या वतीने करण्यात आले आहे.



Comment here