एनएसएल शुगर्स लिमिटेड युनिट-३, जय महेश साखर कारखाना पवारवाडी, ता.माजलगाव, जि.बीड यांनी सन २०२६-२७ या गळीत हंगामातील ऊस दर जाहीर केला आहे. यंदाच्या हंगामासाठी प्रति टन ३१२१ रूपये एकरकमी दराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिल अदा करण्यात येणार असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
कारखान्याच्या या निर्णयामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ऊस उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे. गळीत हंगाम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकरी तसेच ऊस तोडणी ठेकेदार यांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
“शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा, कारखान्याची प्रगती घडवा, शाश्वत शेती—समृद्ध भविष्यासाठी” या उद्देशाने कारखाना व्यवस्थापन शेतकरी व कारखाना यांच्यातील समन्वयातून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. कारखान्याचे जनरल मॅनेजर पारसनाथ जायस्वाल आणि युनिट हेड नारायण मूर्ती यांनी सर्व ऊस उत्पादक व तोडणी ठेकेदारांना जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे.
प्रभाकर राव चेअरमन, एनएसएल शुगर्स लिमिटेड





Comment here