विशेष वार्ता

‘फिजिओथेरपी’ ठरतेय रूग्णांसाठी वरदान : ‘गोवर्धनस्’च्या संचालिका डाॅ.राधिका बजाज यांची माहिती

भगीरथ तोडकरी

माजलगाव : स्पाॅन्डेलोसीस पासून अर्धांगवायू पर्यंत खात्रीशीर इलाज माजलगावस्थित गोवर्धनस् फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये होत असून रूग्णांना आजाराबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी तपासणी शिबीराचे आयोजन केले जाते, अशी माहिती संचालिका डाॅ.राधिका बजाज यांनी ‘वर्तमान’शी बोलताना दिली.

गोवर्धनस् फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये स्पाॅन्डेलोसीस, अर्धांगवायू, तोंड वाकडे होणे, संधिवात, मणक्याची गादी सरकणे व पायाला मुंग्या व बधिरपणा येणे, शस्त्रक्रियेनंतरचे व्यायाम व उपचार, गुडघेदुखी, मानदुखी, फेशियल पाल्शी, सेरेब्रल पाल्सी, हात-पाय बधीरता, स्पोर्टस् दुखापती आदींसह विविध आजारांवर खात्रीशीर तपासणी करून इलाज केले जातात. बदलत्या जीवनशैलीत विविध सांधेदुखीने रूग्ण त्रस्त असतात, अशावेळी आधुनिक तंत्रज्ञानासह तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. माजलगाव शहरात गोवर्धनस् फिजिओथेरपी क्लिनिकच्या माध्यमातून विविध व्याधींनी त्रस्त झालेल्या रूग्णांना दिलासा मिळत अशा प्रतिक्रिया वर्तमानशी बोलताना रूग्णांनी दिल्या. अर्धांगवायूच्या विविध प्रकारांवर फिजिओथेरपी तपासणी आणि उपचार वरदान ठरत असून अशा आजारांवर ‘गोवर्धनस्’मध्ये इलाज केला जातो, अशी माहिती डाॅ.राधिका बजाज यांनी दिली.

वीज पडलेल्या बालकावर केला इलाज

माजलगाव येथील इनामदार रहिमोद्दीन यांचा मुलगा इनामदार जुलखरनैन यास वीज पडून छाती आणि हाताला इजा झाली होती. या बालकावर ‘गोवर्धनस्’मध्ये इलाज करून त्यास मोठा दिलासा दिला आहे. फिजिओथेरपीच्या माध्यमातून सदर बालक पूर्वपदावर आले असून फिजिओथेरपी करण्यापूर्वी हाताची योग्य हालचाल होत नव्हती. त्यानंतर हाताची योग्य हालचाल होत आहे. अशा दुर्धर प्रसंगी ‘गोवर्धनस्’मध्ये खात्रीने या, असा सल्ला डाॅ.राधिका बजाज देतात. गेल्या 22 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत घेतलेल्या तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. रूग्णांना सल्ला, उपचार गोवर्धनस् फिजिओथेरपी क्लिनिक, डाॅ.इंदाणी यांच्या दवाखान्याच्या वरचा मजला, डाॅक्टरलेन, समता काॅलणी, माजलगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन ‘गोवर्धनस्’वतीने करण्यात आले आहे.

Comment here