रक्तदात्यांना पाण्याचा जार भेट
माजलगाव : श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि प्रभू श्रीरामचंद्र सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामनवमी निमित्त बुधवार दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायं ४ वाजेदरम्यान रक्तदान शिबिर झाले. दरम्यान, या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या शिबिरात सहभागी रक्तदात्यांना जार भेट देण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह जगदिश साखरे, माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीस युवराज चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष अरूण राऊत, मनोज फरके, रघुप्रयाग उद्योग समुहाचे अध्यक्ष सागर खुर्पे, पत्रकार बालासाहेब फपाळ, दत्ता येवले, भगीरथ तोडकरी आदींची उपस्थिती होती. यावेळी मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक म्हणाले की, कोरोना काळात गरजू रूग्णांना तत्परतेने रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करणे गरजेचे आहे. कोरोना काळात रक्तदाते हे कोरोनायोध्दा सारखे काम करत आहेत, असेही सभापती डक म्हणाले. तसेच संयोजक प्रभू श्रीरामचंद्र सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर कानडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हे रक्तदान शिबिर जुना मोंढा येथील श्री गणपती मंदिरात झाले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी गोविंद देशमाने, तुकाराम कळसाईतकर, विक्रम शिंदे, दीपक तोडकरी आदींनी परिश्रम घेतले.
Comment here