आपला जिल्हा

सामाजिक जाणीवा जपणारी पत्रकारिता चिरकाल टिकते

‘विकासनामा’च्या प्रकाशनप्रसंगी ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांचे उद्गार

तेलगाव : सामाजिक जाणीवा जपत केलेली पत्रकारिता चिरकाल टिकते असे गौरवोद्गार ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी गुरूवारी जनसामान्यांचा विकासनामा वृत्तपत्राच्या प्रकाशनप्रसंगी काढले.

या प्रकाशनाला अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांच्यासह ‘जनसामान्यांचा विकासनामा’चे संपादक बालासाहेब फपाळ, पत्रकार भगीरथ तोडकरी, गोवर्धन बडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी ‘जनसामान्यांचा विकासनामा’ची भूमिका बालासाहेब फपाळ यांनी मांडली. पुढे बोलताना ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले म्हणाले, सामान्य लोकांचे प्रश्न मोठ्या हिंमतीने मांडणे हे वृत्तपत्राचे काम आहे. वृत्तपत्रांनी वारकरी संप्रदायातील संत विचारांना अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही, अशी खंतही बोधले महाराज यांनी व्यक्त केली. दरम्यान, कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रकाशन झाले.


ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांचा शुभ आशीर्वाद घेताना वर्तमानचे मुख्य संपादक भगीरथ तोडकरी.

Comment here