विशेष वार्ता

‘आरोग्यदूत’ मंगेश चिवटे

भगीरथ तोडकरी

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत गरजू रूग्णांना, गरीबांना तत्परतेने मदत केली जात आहे. या कक्षाची टीम राज्यातील सर्वदूर रूग्णांच्या हाकेला ‘ओ’ देत आहे. कक्षप्रमुख मंगेश चिवटे ‘आरोग्यदूत’ म्हणून पुढे येत आहेत.

महाराष्ट्रात अनेक संघटना उदयास आल्या, मात्र कालौघात काही लुप्त झाल्या तर काही संपल्यात जमा. मात्र सह्याद्रीच्या ताठ कड्याप्रमाणे स्वाभिमानाने उभी आहे ती शिवसेना. संघटनेचे रूपांतर पक्षात झाले आणि आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे विराजमान झालेत. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्केच राजकारण यावर शिवसेना तग धरून आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज सर्व पातळ्यांवर शिवसेना काम करत असताना वैद्यकीय मदत कक्ष मैलाचा दगड म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे 17 नोव्हेंबर 2017 रोजी या कक्षाची स्थापना झाली.

महाराष्ट्रातील गोरगरीब आणि गरजू रूग्णांना लोकदूत म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष काम करत आहे. राज्याचे कणखर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतीदिनाचे औचित्य साधून हा कक्ष कार्यान्वीत झालेला आहे. आणि मदत कक्षाला तीन वर्षे झाली आहेत. कोरोना संकटात असो की नैसर्गीक आपत्ती, कक्षाची टीम सदैव तत्पर राहिलेली आहे. पूर्वाश्रमीचे प्रतिभावंत पत्रकार मंगेश चिवटे या कक्षाचे प्रमुख आहेत. संपूर्ण महाराष्ट्राभर आरोग्य सेवकांचे तगडे नेटवर्क उभे करण्याचे काम कक्षाने केले आहे. आज हजारो रूग्णांना सेवा पुरविण्याचे काम टीम मंगेश चिवटे करत आहे. दुर्धर आजार त्यात महागड्या शस्त्रक्रिया अशावेळी गरजू आणि गरीब रूग्णांना तात्काळ निधी उपलब्ध करण्यासाठी कक्षाची टीम 24 तास राबत असते. कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, लिव्हर, ट्रांन्सप्लांट अशा विविध महागड्या शस्त्रक्रिया बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षामार्फत मोफत केल्या जातात, यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट आदींकडून निधी उपलब्ध करून शस्त्रक्रिया केल्या जातात. डाॅ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातूनही भरीव मदत रूग्णांना आजवर केली आहे.

महाराष्ट्रभर नेटवर्क उभारण्याचा मानस

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम सध्या महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यात सुरू आहे. नाशिक येथे नुकतेच खासदार संजय राऊत, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कक्षाचे उद्घाटन झाले. संपूर्ण राज्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्याचा मानस असून मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम जोमाने सुरू असल्याची माहिती मंगेश चिवटे यांनी ‘वर्तमान’ बोलताना दिली.

Comment here