आपला जिल्हा

आमदार प्रकाश सोळंकेंच्या पाठपुराव्यामुळे कोविड रूग्णांना दिलासा

ग्रामीण भागातील खाजगी रूग्णालयातील दर आले निम्म्यावर

माजलगाव : ग्रामीण भागातील खाजगी रूग्णालयांनी शासनाने दिलेले कोविड रूग्णांसाठीचे दर निश्चित जनसामान्यांच्या आवाक्या बाहेर होते. मात्र माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करून सदर दर अर्ध्यावर आणले आहेत. या निर्णयामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.

शासनाने ग्रामीण भागातील खाजगी रूग्णालयांना जे दर निश्चित केले होते ते सामान्य जनतेला परवडणारे नव्हते. या बाबत आमदार प्रकाश सोळंके यांनी दि. 30 मे रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मुंबईत जावून निवेदन दिले होते. त्यावर मंत्री राजेश टोपे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून सदरील दर अर्धे कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आमदार प्रकाश सोळंके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सामान्य रूग्णांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार सोळंके यांनी नेहमीच सामान्य लोकांची बाजू विधानसभेत मांडली आहे. खाजगी रूग्णालये मनमानी करत अव्वा की सव्वा बिले आकारत असताना मंत्री राजेश टोपे यांच्या एका निर्णयामुळे या प्रकाराला चाप बसला. त्यामुळे राज्यातील जनसामान्य रूग्ण आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना धन्यवाद देत आहेत.

राज्यातील ग्रामीण रूग्णांवरील अन्याय दूर झाला : आमदार प्रकाश सोळंके

वर्तमानशी बोलताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, ग्रामीण भागातील कोविड रूग्णांना अगोदरचे दर परवडणारे नव्हते त्यामुळे सरकारच्या नजरेत ही तफावत आणून दिली. आज झालेल्या निर्णयामुळे मुंबई, पुणे या मेट्रो सिटींसाठी वेगळे दर तर जिल्हा पातळीवरच्या रूग्णालयांसाठी वेगळे दर तर ग्रामीण भागांसाठी हे दर निम्म्यावर आणण्यात आलेले आहेत. अगोदरचे दर मेट्रो सिटींसाठी आणि ग्रामीण भागासाठी सारखेच होते हा अन्याय दूर करण्यात सरकार दरबारी मला यश आलेले आहे.

अगोदरचे दर
………………..

1) जनरल वार्ड + विलगीकरण = 4000 प्रति दिवस
2) आयसीयु (व्हेंटीलेटर शिवाय) + विलगीकरण = 7500 प्रति दिवस
3) आयसीयु (व्हेंटीलेटर सह) + विलगीकरण = 9000 प्रति दिवस

सुधारित दर
………………

1) जनरल वार्ड + विलगीकरण = 2000 प्रति दिवस
2) आयसीयु (व्हेंटीलेटर शिवाय) + विलगीकरण = 3750 प्रति दिवस
3) आयसीयु (व्हेंटीलेटर सह) + विलगीकरण = 4500 प्रति दिवस

Comment here