डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात राष्ट्रीय निषेध कार्यक्रमात सहभाग
माजलगाव : कोरोना काळात जीवाची बाजी लावून रूग्णसेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवर देशाच्या कानाकोपऱ्यात हल्ले होत आहेत. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय स्तरावर शुक्रवारी निषेध दिवस पुकारला असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माजलगाव शाखेचे डॉक्टर्सनी काळ्या फिती लावून या निषेध कार्यक्रमाला दि.१८ जून रोजी आपला पाठिंबा दर्शवित तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. या घटनांच्या निषेधार्थ आयएमए हा राष्ट्रीय निषेध दिन पाळत असून ‘जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे रक्षण करा’ असे या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन माजलगाव शाखेचे अध्यक्ष डॉ.शामसुंदर काकाणी म्हणाले, मागील दीड वर्षांपासून डॉक्टर करत असलेली रूग्णसेवा सुरूच आहे मात्र डॉक्टरांवरील भ्याड हल्यांबाबत निषेध व्यक्त करतोत आणि आता सहन करणार नाहीत. शुक्रवारी निषेध दिनाचे औचित्य म्हणून आयएमएचे डॉक्टर काळ्या फिती, काळी मुखपट्टी लावून काम करत आहेत. माध्यमे आणि समाज माध्यमांच्या मदतीने डॉक्टरांची बाजू समाजापर्यंत पोहोचविली असल्याचेही डॉ.काकाणी यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सहसचिव डॉ.शिवाजी काकडे म्हणाले, सर्व रूग्णालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यात यावी. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधातील गुन्हे जलदगती न्यायालयांमध्ये चालवले जावेत. आरोपींना कठोर शासन व्हावे, या मागण्या आयएमए राष्ट्रीय स्तरावर करत आहे. त्या मागण्यांचा पुनरुच्चार आम्ही सर्व स्तरांमध्ये करत आहोत असेही डाॅ.काकडे म्हणाले. यावेळी तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार अशोक भंडारी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन डाॅक्टर्सनी दिले. यावेळी डाॅ.शिवाजी काकडे, डाॅ.शामसुंदर काकाणी, डाॅ.शंकर जुजगर, डाॅ.यशवंत राजेभोसले, डाॅ.विजय खळगे, डाॅ.सचिन डक, डाॅ.दीपक कोडगीरकर, डाॅ.सुशिल मुगदिया, डाॅ.राजेश रूद्रवार, डाॅ.स्वानंद कुलकर्णी, डाॅ.प्रविण राठोड, डाॅ.परम राठोड, डाॅ.राहुल लड्डा यांची उपस्थिती होती.
Comment here