आपला जिल्हा

संजीवनी हाॅस्पिटलने नावलौकिक करावे : आमदार प्रकाश सोळंके

माजलगाव : येथील डाॅ.ज्ञानेश्वर गिलबिले संचलित संजीवनी हाॅस्पिटलने भविष्यात किर्ती वाढवावी, नावलौकिक करावे असे आवाहन आमदार प्रकाश सोळंके यांनी केले. ते गुरूवारी संजीवनी हाॅस्पिटल अ‍ॅण्ड क्रिटीकल केयर सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.प्रकाश आनंदगावकर यांची तर भागवताचार्य ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज कोटुळे, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे, जिल्हा परिषद सभापती जयसिंग सोळंके, माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, डाॅ.गजानन देशपांडे, डाॅ.श्रेयश देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीस भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. आमदार प्रकाश सोळंके पुढे बोलताना म्हणाले, माजी सैनिक विठ्ठलराव गिलबिले यांनी देशाची सेवा केली नंतर ते लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून कामही पाहिले आहे. ते आमच्या परिवरातील एक सदस्य आहेत. तसेच त्यांचे चिरंजीव डाॅ.ज्ञानेश्वर गिलबिले एमबीबीएस सारखे शिक्षण घेतले. खरे तर त्यांना इतरत्र एखाद्या मोठ्या शहरात काम करण्यासाठी संधी मिळाली असती, मात्र त्यांनी या समाजाचे आपण काहीतरी देणेकरी लागतो या भावनेतून माजलगाव शहरात अद्ययावत असे सुसज्ज हाॅस्पिटल उभारले. किडनी केअर व डायलिसिस, एन्डोस्कोपी सारख्या या सुविधा ग्रामीण आपल्या शहरात सुरू केल्या, याचा मला अभिमान वाटतो. तसेच सर्वसामान्य रूग्णांना अल्पदरात सेवा डाॅ.गिलबिले यांनी द्यावी अशी अपेक्षा आमदार सोळंके यांनी व्यक्त करत पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डाॅ.प्रकाश आनंदगावकर यांनीही आपले मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच प्रास्ताविकपर भाषण डाॅ.ज्ञानेश्वर गिलबिले यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिष सावंत तर आभार नवनाथ गिलबिले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल सरोदे, नवनाथ शेरकर, विजयकुमार सोलापुरे यांनी मेहनत घेतली. संजीवनी हाॅस्पिटलच्या शुभारंभानिमित्त डाॅ.ज्ञानेश्वर गिलबिले यांना सर्व स्तरातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या.


संजीवनी हॉस्पिटलच्या शुभारंभाप्रसंगी आमदार प्रकाश सोळंके आणि मान्यवर.


हॉस्पिटलच्या तपासणी कक्षाचे फीत कापून उद्घाटन करताना जि.प.सभापती जयसिंग सोळंके आणि मान्यवर.


आय.सि.यू. कक्षाची पाहणी करताना आमदार प्रकाश सोळंके आणि मान्यवर.

Comment here