विशेष वार्ता

‘दीपपर्व’ दिवाळी अंकाची गुणवत्ता सिध्द

प्रकाशनप्रसंगी उद्योगपती माधव निर्मळ यांचे गौरवोद्गार 

धारूर : सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी वर्तमानपत्रांचे योगदान उल्लेखनीय आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा आढावा घेवून वर्तमान माध्यम समुहाच्या दीपपर्व विशेषांकाने आपले वेगळेपण सिध्द केले आहे, असे गौरवोद्गार नर्मदा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा उद्योगपती माधव निर्मळ यांनी काढले. ते दीपपर्व विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते.

धारूर येथे उद्योगपती माधव निर्मळ यांच्या निवासस्थानी शुक्रवार, दि.५ नोव्हेंबर रोजी वर्तमान माध्यम समुहाचा ‘दीपपर्व २०२१’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, मनोहर डाके, उत्तम तोष्णीवाल, देवा लोंढे, ‘वर्तमान’चे संपादक भगीरथ तोडकरी, बाबा देशमाने आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना माधव निर्मळ म्हणाले, प्रत्येक क्षेत्रातील विकासासाठी वर्तमानपत्रांचे योगदान आहे. वर्तमान माध्यम समूह सामाजिक जाणिवा जपत पत्रकारिता करत आहे. विविध विषयांची दर्जेदार मांडणी करून ‘वर्तमान’ने अल्पावधीत गुणवत्ता सिध्द केली आहे. ‘वर्तमान’च्या पत्रकारितेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सकारात्मक पत्रकारिता काय असते, याचा वस्तुपाठ ‘वर्तमान’ने घालून दिला, असेही उद्गार उद्योजक माधव निर्मळ यांनी काढले.

Comment here