माजी मंत्री बबनराव घोलप यांची उपस्थिती
माजलगाव : राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका माजलगाव शाखेच्या वतीने येत्या शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी शहरातील माँ वैष्णवी मंगल कार्यालयात संत शिरोमणी रोहिदास महाराज आणि संत कंकैय्या महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती जयंती महोत्सव सोहळ्याचे निमंत्रक तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके, युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव यांनी दिली आहे.
संत शिरोमणी रोहिदास महाराज आणि संत कंकैय्या महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे उद्घाटक म्हणून भाजपा नेते रमेशराव आडसकर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक तथा माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप राहणार आहेत. विशेष उपस्थितीमध्ये माजलगावचे माजी आमदार आर.टी.देशमुख, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे, मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष डाॅ.मिलिंद आवाड, बीड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जयसिंह सोळंके, कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के, समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, राज्य प्रवक्ते रोहिदास बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष एन.डी.शिंदे, सुदाम कांबळे, मानवतचे नगराध्यक्ष सखाराम पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, शुभमंगल मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजी रांजवण, माजी नगराध्यक्ष शेख मंजूर, शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष अरूण राऊत, ज्ञानेश्वर मेंडके, नितीन नाईकनवरे, विजय साळवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. माँ वैष्णवी मंगल कार्यालयात येत्या शनिवारी दुपारी 12 वाजता जयंती सोहळ्याला प्रारंभ होईल, अशी माहिती तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे, शहराध्यक्ष प्रसाद वाघमोडे यांनी दिली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समिती अध्यक्ष अश्विन खंडागळे, उपाध्यक्ष विजय नरहीरे, सचिव दत्ता जाधव, कार्याध्यक्ष संतोष जाधव, कोषाध्यक्ष नवनाथ घोडके, सदस्य संतोष खंडागळे आदींसह समाज बांधव परिश्रम घेत आहेत.
आमदार प्रकाश सोळंकेसह विविध मान्यवरांचा सन्मान
संत शिरोमणी रोहिदास महाराज आणि संत कंकैय्या महाराज यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना विकासपुरूष सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोहन जगताप (सहकार), डाॅ.प्रकाश आनंदगावकर (आरोग्यसेवा), श्रीदेवीताई फुलारे (आदर्श नगरसेविका), दिपालीताई कांबळे (समाजभूषण), रविंद्र कानडे (आर्थिक क्रांती), धम्मानंद साळवे (सामाजिक कार्य), अशोक वाडेकर (आदर्श शिक्षक) आणि बालाजी मारगुडे (पत्रकारिता) आदींचा सन्मान होणार आहे.
Comment here