माजलगाव : शहरामध्ये समस्त ब्राम्हण समाजाच्या वतीने रविवार, दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सामुदायिक उपनयन संस्कारचे आयोजन करण्यात आले असुन माउली लॉन्स येथे भव्य-दिव्य असा मंडपसह जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती उपनयन समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख यांनी दिली आहे.
मानवांच्या ऐहिक व पारलौकिक उत्कर्षासाठी केवळ आणि केवळ वेद माउली समर्थ आहे. विवेक, सदाचार, ज्ञान आणि विज्ञानाची प्राप्ती, वेदाध्ययन व वेदप्रतिपादित कर्मांतूनच होते, आणि वेदाध्ययनाचा हा मौलिक अधिकारी बटूंना उपनयन संस्काराद्वारे प्राप्त होणार आहे. माजलगाव येथील समस्त ब्राम्हण समाजाच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार चे आयोजन रविवारी सकाळी ११.१२ वाजता करण्यात आले आहे. यावेळी रामचंद्र गोपालकृष्ण मठाचे मठाधिपती श्री श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाची माउली लॉन्स येथे जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सासमुदायिक उपनयन समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, बप्पा देशमुख, विनायक रत्नपारखी, आनंतशास्त्री जोशी, नंदू आनंदगांवकर, दामोधर संधीकर, दत्ता महाजन, मुकुंद जोशी, गणेश मुळे,कृष्णा कान्नापुरकर यांचेसह समस्त ब्राम्हण समाज माजलगावच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
Comment here