फेब्रुवारीचा हप्ता का रखडला? कारण आले समोर
मुंबई : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे फेब्रुवारीचा हप्ता रखडल्याचे कारण आता समोर आले आहे. दरम्यान, आता लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी पैसे येऊ शकतात.
लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रूपये दिले जातात. जानेवारी महिन्यापर्यंत महिलांना पैसे मिळाले आहेत. परंतु आता फेब्रुवारी महिना संपत आला असूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे १५०० रूपये कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकांपूर्वी राबवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. आज २८ तारीख आहे तरीही अजून पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
लाडकी बहीण योजनेत पैसे लवकर येणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले होते. मी लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सही करून आलोय, असंही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. परंतु तरीही अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, आता यामागचे कारण समोर आले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
Comment here