आपला जिल्हा

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून माजलगाव मठाची प्रशंसा 

नवी दिल्ली : श्री सद्गुरु मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या कार्यावर आधारित वर्तमान माध्यम समुहाने प्रसिद्ध केलेल्या ‘दीपस्तंभ’ विशेषांकाचे केंद्रीय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी कौतुक केले. दरम्यान, माजलगाव मठाचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या कार्याची मंत्री रक्षाताई खडसे यांनी प्रशंसा केली.

नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी केंद्रीय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची वर्तमान टीमने भेट घेऊन दीपस्तंभ हा गुरूपौर्णिमा विशेषांक भेट दिला. यावेळी मंत्री खडसे यांनी वर्तमान माध्यम समुहाच्या सकारात्मक पत्रकारितेची दखल घेत आजमितीला समाजात घडणार्‍या सकारात्मक घटनांचे प्रतिबिंब माध्यमांमध्ये उमटले पाहिजे. तो वसा आणि वारसा प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न संपादक भगीरथ तोडकरी आणि त्यांची टीम करत आहे, हे कौतुकास्पद आहे. दरम्यान, वर्तमान माध्यम समूह वेगवेगळे दर्जेदार विशेषांक प्रसिद्ध करून समाजात नवा आदर्श पायंडा पाडत आहे. त्याचीच पावती म्हणून माजलगाव मठाचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या कार्यावर आधारित दीपस्तंभ गुरूपौर्णिमा विशेषांक वाखाणण्याजोगा आहे. मठाचे धार्मिक आणि सामाजिक कार्य यातून माहिती झाले. एकदंरीत श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे कार्य महाराष्ट्राच्या पटलावर आले, असेही मंत्री रक्षाताई खडसे म्हणाल्या.

Comment here