आपला जिल्हा

वडवणीत सिंग इज किंग!

वडवणी बाजार समितीत १८ पैकी १८ जागा सोळंकेंकडे

वडवणी : सर्वांची उत्सुकता शिगेला लागलेल्या वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विरोधकांना चारी मुंड्या चित करीत शेतकरी महाविकास आघाडीत पॅनलचे सर्व १८ उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, युवा नेते जयसिंह सोळंके या निवडणुकीसाठी तळ ठोकून वडवणीत होते. हा विजय ‘सिंग इज किंग’चा असल्याच्या प्रतिक्रिया जयसिंह सोळंके यांच्या समर्थकांकडून उमटत आहेत.

वडवणी येथील प्रतिष्ठेची झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १८ जागेवर आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार केशव आंधळे यांच्या शेतकरी महाविकास आघाडी पॅनलचे विजय मिळवला आहे. वडवणी बाजार समिती निवडणूक अत्यंत आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार केशव आंधळे, जयसिंग सोळंके यांच्या विरूद्ध राजाभाऊ मुंडे यांनी यांच्या पॅनलमध्ये अटीतटीची निवडणूक होईल असे चित्र होते. यासाठी शुक्रवार, दि. २८ एप्रिल रोजी मतदान होऊन मतमोजणी झाली. यामध्ये सर्वच्या सर्व जागांवर आमदार प्रकाश सोळंके यांच्या शेतकरी महाविकास आघाडी पॅनलने १८ पैकी १८ जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुरळा उडवला. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालाकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

विजयी झालेले उमेदवार 

सोसायटी मतदार संघातून खोटे रोहिदास अश्रुबा, गरड शिवाजी आनंदराव, नाईकवाडे नंदकुमार निवृत्ती, मस्के दिनेश बन्सीधरराव, शेळके प्रदीप राजेंद्र, शिंदे अमरसिंह पंजाबराव, शिंदे संभाजी मुरलीधर, शेख दिलशादबी समशेर, शेळके अनुराधा नारायण, चोले अनिल अश्रुबा, शिंदे विश्वनाथ भगवान हे तर ग्रामपंचायत मतदार संघातून बादाडे अतुल बंडू, लंगडे सचिन सुखदेवराव, मांजरे बबन धुराजी, कदम अभिमान अर्जुन तर व्यापारी मतदार संघातून अंडील पांडुरंग अंबादास, धस रणजित मधुकर, हमाल मापाडी मतदार संघातून साळवे भिकाराम धर्मराज हे उमेदवार विजयी झाले आहेत.

Comment here