भाजप नेते मोहन जगताप यांची माहिती
माजलगाव : राज्य शासनाच्या राजमाता जिजाऊ नदी सुशोभीकरण योजनेतून सिंदफणा नदीचे सुशोभीकरण होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून या कामासाठी पंधरा कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजप नेते तथा छत्रपती कारखाना उपाध्यक्ष मोहन जगताप यांनी दिली.
राज्यात राजमाता जिजाऊ नदी सुशोभीकरण योजनेअंतर्गत सिंदफणा नदीचेही सुशोभीकरण व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत पंधरा कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेत त्याची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत टेंडर प्रक्रिया राबविली आहे. यामध्ये सिंदफणा नदीकाठी असलेल्या सिद्धेश्वर मंदिराजवळ पुलाची उभारणी तसेच मोठ्या पुलापर्यंत घाट उभारणीचे काम करण्यात येणार असल्याचेही मोहन जगताप यांनी सांगितले आहे.
Comment here