आपला जिल्हामहा-राष्ट्र

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नव्या निवडी जाहीर

सोमेश्वर सोनटक्के, भगीरथ तोडकरी, रविंद्र राऊत, प्रकाश काशिद यांची वर्णी

बीड : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सोमेश्वर सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्षपदी भगीरथ तोडकरी, जिल्हा सहसचिवपदी रविंद्र राऊत, माजलगाव तालुका उपाध्यक्षपदी प्रकाश काशिद या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

बीड येथे २९ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मान्यतेने विभागीय, तथा बीड जिल्हा अध्यक्ष वैभव स्वामी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा श्रीहरी देशमाने यांनी नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी व्यापक लढा उभारणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हे राज्यात सर्वाधिक सदस्य असलेले महासंघटन आहे. आगामी काळात ग्रामीण भागात याहीपेक्षा व्यापक संघटन उभारण्यासाठी क्रियाशील पत्रकारांना या प्रवाहात जोडले जाईल, असे वैभव स्वामी, बाबा श्रीहरी देशमाने यांनी सांगितले. सोमेश्वर सोनटक्के धारूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी सामाजिक जाणिवा जपत आजवर परखड पत्रकारिता केली आहे. भगीरथ तोडकरी यांनी वर्तमानच्या माध्यमातून सकारात्मक पत्रकारिता केली आहे. रविंद्र राऊत आणि प्रकाश काशिद यांच्या पत्रकारीतेत योगदानाबद्दल त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अनुक्रमे जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे. दरम्यान, मराठवाडा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सोमेश्वर सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्षपदी भगीरथ तोडकरी, जिल्हा सहसचिवपदी रविंद्र राऊत, माजलगाव तालुका उपाध्यक्षपदी प्रकाश काशिद या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

सोमेश्वर सोनटक्के (उपाध्यक्ष, मराठवाडा विभागीय)

भगीरथ तोडकरी (उपाध्यक्ष, बीड जिल्हा)

रविंद्र राऊत (सहसचिव, बीड जिल्हा)

प्रकाश काशिद (उपाध्यक्ष, माजलगाव तालुका)

Comment here