आपला जिल्हा

तब्बल १२३ वर्षांची परंपरा लाभलेल्या टेंबे गणपतीची थाटात स्थापना

माजलगाव : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या व निजामकालीन १२३ वर्षांची परंपरा असलेल्या टेंबे गणपतीची सोमवार, दि. २५ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली.

निजामकालिन राजवटीत १२२ वर्षांपूर्वी स्थापना मिरवणूकीस परवानगी नसल्याने मिरवणूक आडविण्यात आली होती. त्यामुळे सदस्यांनी मिरवणूक अडविलेल्या ठिकाणाहून घोड्यावर हैद्राबाद येथे जात ताम्रपटावर स्थापना परवानगी आणली होती. यामुळे पाच दिवस गणपती त्याच ठिकाणी थांबविण्यात आला होता. यामुळे मागील १२२ वर्षांपासून या गणपतीची स्थापना पाच दिवसांसाठीच असते. स्थापनेपासूनच या गणपतीची मुर्ती माती, शेण, चिखल, साळवणाच्या मिश्रणातुन साकारली जाते. एवढे वर्षे लोटली काळ बदलला तरी देखिल ईकोफ्रेंडली मुर्तीची परंपरा मंडळाने आजही टिकविलेली आहे. पीओपीच्या मूर्तींमुळे जलप्रदुषण होते. याची जाणिव ठेवत चिखल-मातीच्या मुर्तीची स्थापना करण्यात येते. स्थापना वर्षे १९०१ निजामकाळात विजेची सोय नसल्याने गणपती विसर्जन मिरणूकीत प्रकाश असावा म्हणून भाविक आगीचे टेंबे धरत असत. ही परंपरा आजही कायम असून यानंतर नवसपूर्ती, वंशवृध्दीसाठी मानाचे टेंबे घेउन अनेकजण मिरवणूकीत सहभागी होऊ लागल्याने मंडळाला टेंबे गणपती असे नाव पडले, असे जाणकार सांगतात.

कोरोना काळात गरजवंतांच्या हाकेला धावले मंडळ

कोरोना काळात गोर-गरिब, वंचित, उपेक्षित लोकांना ४५ दिवस अन्नदानाचा यज्ञ, किराणा किटचे वाटप यासह विविध उपक्रम मंडळाने राबविलेले आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिली.

Comment here