आपला जिल्हा

ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक महासभा

ऐतिहासिक महासभेचे साक्षीदार व्हा : डॉ संजय नाकलगावकर

माजलगाव : लढाई वंचितांच्या सत्तेची या महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आज बुधवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी उपस्थित रहाणार असुन बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या ऐतिहासिक महासभेचे साक्षीदार व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे माजलगाव तालुकाध्यक्ष डॉ.संजय नाकलगावकर यांनी केले आहे.

सध्या देशभर मोदी सरकारने सुरू केलेले कंत्राटी पद्धतीने सरकारी नौकरी भरती, सरकारी शाळांचे खाजगीकरण, दलित मुस्लीम अल्पसंख्याक समाजावर देशभर होत आसलेले हल्ले, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण मुस्लिम आरक्षण, गायरान धारकांची प्रश्न या सर्व विषयांवर बाळासाहेब आपली भुमिका मांडणार आहेत. या सभेला प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, फारूक भाई अहमद, प्रा.नागोराव पांचाळ, अॅड.सर्वजित बनसोडे, अॅड.गोंविद दळवी, अनिलभाऊ जाधव, प्रा.विष्णु जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी माजलगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजुर, युवक, सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थी, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सभा यशस्वी करावी असे आवाहन माजलगाव तालुकाध्यक्ष डॉ.संजय नाकलगावकर यांनी केले आहे.

Comment here