महा-राष्ट्र

बाजीराव चव्हाण मराठवाडा शिल्पकार पुरस्काराने सन्मानित

केंद्रीय मंत्री रामेश्वरजी तेली यांच्या हस्ते पुण्यात गौरव

पुणे : सामाजिक आणि आरोग्यसेवेत भरीव योगदान देणारे धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांना केंद्रीय पेट्रोलियमंत्री राज्यमंत्री रामेश्वरजी तेली यांच्या हस्ते उद्याच्या मराठवाड्याचे शिल्पकार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

बाजीराव चव्हाण यांनी उद्योग, सामाजिक आणि आरोग्य सेवेत अल्पावधीत वेगळा ठसा उमटविला आहे. धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत असून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत शेकडो गरीब आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती आणि वृदांवन फाउंडेशनच्या विविध मान्यवरांना उद्याच्या मराठवाड्याचे शिल्पकार हा पुरस्कार देण्यात आला. सोमवार, ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता गणेश सभागृह, न्यू इंग्लिश हायस्कूल टिळक रोड, पुणे येथे हा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत शेषाद्री अण्णा डांगे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार तथा मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती अध्यक्ष डॉ.सुनिल गायकवाड, संयोजक सचिन पाटील, कार्यवाह सिद्धेश्वर माने, कार्याध्यक्ष स्वप्निल देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

हा संपूर्ण बीड जिल्ह्याचा सन्मान : बाजीराव चव्हाण

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले बाजीराव चव्हाण यांचे उद्योग, सामाजिक आणि वैद्यकीय सेवेतही भरीव काम सुरू आहे. उद्याच्या मराठवाड्याचे शिल्पकार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याने सामाजिक कामाची पावती मिळाली, शिवाय हा संपूर्ण बीड जिल्ह्याचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया बाजीराव चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Comment here