आपला जिल्हा

‘तुळजाभवानी अर्बन’ने जपली सामाजिक बांधिलकी

अंतरवाली सराटी महाविराट सभेस २० हजार पाणी बाॅटल्सचे वाटप

माजलगाव : अंतरवाली सराटी येथे शनिवार, दि.२४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणासंदर्भात महाविराट सभा झाली. या सभेसाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना २० हजार पाणी बाॅटल्सचे वाटप तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव तर्फे करण्यात आले.

सहकार क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव संस्था नेहमीच सामाजिक कार्यातही अग्रेसर असते. शनिवारी मराठा आरक्षण महाविराट सभेसाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना तालखेड फाटा येथे २० हजार पाणी बाॅटल्सचे मोफत वाटप करण्यात आले. तुळजाभवानी संस्थेमार्फत ही सोय करण्यात आली. सभेत येणाऱ्या कोणत्याही समाज बांधवांचे हाल होऊ नये या उद्देशातून पिण्याच्या पाण्याच्या तब्बल २० हजार पाणी बाॅटल्स मोफत वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी तुळजाभवानी अर्बन संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ, संचालक तुकाराम जगधने, आस्थापना विभाग प्रमुख अशोक मगर, अनिल गायकवाड, स्वप्निल स्वामी, बळीराम साबळे, जनार्धन जाधव, नवनाथ पवार, सचिन पट्टेकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Comment here