गुरूवार दि.२१ डिसेंबर मौजे जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा समाजाचे लढवय्ये नेते, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी मराठा आरक्षणावर ठोस तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळात राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपानजी भुमरे, ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीशजी महाजन, मुख्यमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेशजी चिवटे, मुख्यमंत्री महोदय यांचे विश्वासू बाजीरावजी चव्हाण यांचा सहभाग आहे. मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न निर्णायक टप्प्यावर आला असताना सरकारच्या शिष्टमंडळात बीडच्या बाजीराव चव्हाण यांचा सहभाग महत्वाचा मानला जात आहे.
संवेदनशील शिंदे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणारच : बाजीराव चव्हाण
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संवेदनशील शिंदे सरकार अनुकूल असून समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारकडून अतिशय सकारात्मक संवाद साधला जात आहे. मराठा समाजाला शिंदे सरकार आरक्षण देणारच आहे, असा ठाम विश्वास बाजीराव चव्हाण यांनी शिष्टमंडळात बोलताना व्यक्त केला.
Comment here