बीड : महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते सहपरिवार प्रभू श्री वैद्यनाथ मंदिरात रुद्राभिषेक आणि आरती करून शासकीय महापूजा संपन्न झाली. याप्रसंगी त्यांचे समवेत पती विश्वास सोपानराव मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महाशिवरात्रीनिमित्त शासकीय महापूजा आयोजित करण्यात आली. यावेळी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
Comment here