आपला जिल्हा

दिंद्रुड ग्रामपंचायतीला मिळाला उच्चशिक्षित तरूण ‘कारभारी’

दिंद्रुड ग्रामपंचायतीला मिळाला उच्चशिक्षित तरूण ‘कारभारी’

सरपंचपदासाठी अजय कोमटवार यांच्या नावावर “शिक्कामोर्तब”

Mमाजलगाव : दिंद्रुड ग्रामपंचायतला अनुसूचित जमातीसाठी सरपंच पद राखीव आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ अजय कोमटवार व त्यांचा पॅनल बहुमताने विजयी झाल्याने सरपंच पदासाठी अजय दिलीपराव कोमटवार यांच्या नावाने शिक्कामोर्तब झाले असून दिंद्रुडला उच्चशिक्षित सरपंच मिळत आहे. 



पंधरा ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या दिंद्रुड ग्रामपंचायत निवडणुकीत येथील माजी सरपंच दिलीप कोमटवार यांच्या नेतृत्वाखाली ११ उमेदवार तर जनसेवा ग्रामविकास आघाडीचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंच पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने या प्रवर्गात विजयी झालेले अजय कोमटवार हेच सरपंच होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. अजय दिलीपराव कोमटवार हे ३१ वर्षीय युवा सरपंचपदी विराजमान होत आहेत. एम.सी.ए.ची पदवी प्राप्त उच्च शिक्षित तरुण नेतृत्व गावाचा चेहरामोहरा आधुनिक करण्यासाठी दिंद्रुडच्या सेवेत पुढील पाच वर्षे काम करणार आहेत.

Comment here