आपला जिल्हा

अपघाती मृत्यू झालेल्या सचिन नाईक यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाचा मदतीचा हात

उमद्या पत्रकाराला माजलगावकर मुकले : वसंत मुंडे

माजलगाव : येथील तरूण पत्रकार सचिन नाईक यांच्या अपघाती निधनामुळे माजलगावकर उमद्या पत्रकाराला मुकले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

बुधवार, १७ एप्रिल रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी नाईक यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाईक यांच्या कुटुंबियांना त्यांचे वडील, बंधू यांच्याकडे अर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. माजलगाव येथील तरूण पत्रकार सचिन नाईक यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. सचिन नाईक हा कुटुंबातील कर्ता होता. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. आई-वडील वयोवृद्ध आहेत. नाईक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सहभागी आहे. मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या पुढाकारातून मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, राज्य कार्यकारिणी सदस्य बाबा देशमाने, प्रा.सुदर्शन स्वामी, परमेश्वर सोळंके, किसन भदर्गे, रविकांत उघडे, संतोष जेथलिया यांनी सांत्वनपर भेट घेत आर्थिक मदत केली.

Comment here