राज्यप्रमुख रामहरी राऊत यांची रूग्णालयात धाव
चंद्रपूर : जिल्ह्यातील माजरी या गावात ४०० जणांना विषबाधा झाली. सर्व रूग्णांना भद्रावती, वरोरा उपजिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व रूग्णांना रूग्णालयात दाखल करून संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि खा.डॉ.श्रीकांत(दादा) शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख श्री मंगेशजी चिवटे यांच्या सूचनेनुसार शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी वरोरा उपजिल्हा रूग्णालयात धाव घेऊन रूग्णांनी विचारपूस केली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मते यांनी धाव घेऊन उपचारासाठी रूग्णांची मदत केली. या विषबाधा रूग्णांना डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार घेऊन एक दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी वरोरा उपजिल्हा रूग्णालयात भेट घेऊन रूग्णांची विचारपूस केली. याप्रसंगी चंद्रपूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते, माजरी शहरप्रमुख मदन चिकवा, आरोग्यदूतचे सहसंपादक भगीरथ तोडकरी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पूर्व विदर्भ सचिन डाखोरे, वैद्यकीय सहाय्यक नितीन हिलाल, विजय ठाकरे यांची उपस्थिती होती.
Comment here