आपला जिल्हा

हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घ्यावा

डॉ.सुरेश साबळे यांचे आवाहन

माजलगाव : रामभक्त हनुमान यांच्या जयंतीच्या निमित्ताने माजलगाव येथील दक्षिणमुखी मारोती मंदिरामध्ये हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून या महोत्सवाकरता सकाळी ७ ते ८ या वेळी शिवमुद्रा डान्स तसेच सायंकाळी ४ वाजता सुंदरकांडचे आयोजन केले असून या सर्व कार्यक्रमास माजलगाव येथील रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन डॉ.सुरेश साबळे यांनी केले आहे.

माजलगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन हे केले आहे. या कार्यक्रमासाठी जगदीश चांडक, हेमंत कदम, भारत होके, नंदकिशोर मुंदडा, बंडू इके, गोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पहाटे ५ वाजता माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील व डॉ.सुरेश साबळे यांच्या हस्ते विधीवत अभिषेक संपन्न होणार असून त्यानंतर हनुमान जन्मोत्सव संपन्न होईल. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचा लाभ सर्व रामभक्तांनी घ्यावा असे कळविण्यात आले आहे.

Comment here