पंकजाताई मुंडे यांनी केले अंबाजोगाईत स्वागत
नागपूर/ छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रव्यापी आरोग्यदूत फाऊंडेशनने काढलेल्या आरोग्य संवाद यात्रेने संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा अक्षरशः पिंजून काढला. या यात्रेचा गडचिरोली ते गडहिंग्लज असा प्रवास सुरू आहे. अंबाजोगाई येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आरोग्य संवाद यात्रेचे स्वागत केले.
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र व्यापी आरोग्य संवाद सुरू झालेली आहे. गेल्या दि.९ एप्रिल २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आरोग्य संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात संपूर्ण विदर्भ, मराठवाडा अणि पश्चिम महाराष्ट्र असा प्रवास सुरू आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख राम राऊत यांनी दिली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सुरू असलेले आरोग्यविषयक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापक जनजागृती व्हावी, हा या संवाद यात्रेचा मुख्य उद्देश आहे, असे राऊत यांनी सांगितले. दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णांना गेल्या १ वर्ष ९ महिन्यात एकूण २३० कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य गरीब, गरजू रुग्णांना वितरीत केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रूग्ण हा मदतीविना वंचित राहू, नये याची दक्षता घेण्याचे आदेशच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुषंगाने व्यापक जनजागृती व्हावी यासाठी आरोग्यदूत फाऊंडेशनने ही यात्रा काढली आहे. यात्रेचे संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा भागात स्वागत झाले.
आरोग्य संवाद यात्रा प्रभावी ठरतेय : मंगेश चिवटे
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळविण्यासाठी गरजुंनी थेट अर्ज करून मदत मिळवावी. योजनेची व्यापक जनजागृती व्हावी, यासाठी ही यात्रा प्रभावी ठरत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय अधिक माहितीसाठी राज्यातील नागरिकांनी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवावा आणि स्वतः अर्ज करा, असे आवाहन या संवाद यात्रेत केले जाते, अशी माहिती मुख्यमंत्री महोदय यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी दिली.
यात्रेत मान्यवरांचा सहभाग
विदर्भ, मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रामटेक- राजू पारवे, नागपूर- नितीन गडकरी, चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार, यवतमाळ-वाशिम – राजश्रीताई हेमंत पाटील, हिंगोली- बाबुराव कदम कोहळीकर, परभणी- महादेव जानकर, छत्रपती संभाजीनगर- संदीपान भुमरे, शिर्डी- सदाशिव लोखंडे, बीड- पंकजाताई मुंडे यांनी आपापल्या मतदारसंघात आरोग्य संवाद यात्रेचे स्वागत केले. आरोग्य संवाद यात्रेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत, शासनाच्या आदर्श ग्राम समितीचे सदस्य पुरुषोत्तम वायाळ, आरोग्यदूत फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज काकडे, रूग्णसेवक बाजीराव चव्हाण, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हाप्रमुख निखिल बुडजडे, आरोग्यदूतचे संपादक बाबा देशमाने, सहसंपादक भगीरथ तोडकरी, वैद्यकीय सहाय्यक नितीन हिलाल यांचा सहभाग आहे.
Comment here