महा-राष्ट्र

शिंदे सरकारची ‘माझी लाडकी बहीण’ नेमकी आहे काय?

राज्य सरकारची थेट लाभ मिळवून देणारी योजना

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडला. यामध्ये महिल्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यातलीच एक योजना आहे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेतून राज्य सरकार महिलांना आर्थिक मदत करणार आहे. आज अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केल्यानंतर आता याचा शासन निर्णय ही जाहीर करण्यात आला आहे. शासन निर्णयात या योजनेचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो, यासाठी कोण आहे पात्र, याचे काय आहेत नियम आणि अटी? याबद्दल सावितर माहिती देण्यात आली आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घ्या.

योजनेचे स्वरूप

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंककेलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रूपये १,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रूपये १,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल. राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता

१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.

२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

३) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.

४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रूपये २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक :

१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.

२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.

३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.

४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रूपये २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).

५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

६) पासपोर्ट आकाराचा फोटो.

७) रेशनकार्ड.

८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची?

1) अंगणवाडी सेविका, 2) गावातील आशा वर्कर, 3) सर्व बचत गटाच्या महिला

गावातील सर्व लाभार्थी महिलांची माहिती “नारी शक्ती दूत” अॅप मध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावयाची आहे. माहिती भरत असतांना सोबत लाभार्थी महिलेचे कार्ड असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर, सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत माहिती देऊन “नारी शक्ती दूत”ॲप त्यांना प्लेस्टोर वरून डाऊनलोड करून या योजने करता अर्ज भरता येणार आहे. तसेच गावातील पात्र असणाऱ्या २१ ते ६० वयोगटातील महिलांना सुद्धा गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्र तयार करून सदर योजने करता ऑनलाइन अर्ज भरण्किंयाची सुविधा देण्वायात येणार आहे. माहिती भरणेबाबत जनजागृती करण्यासठी अंगणवाडी केंद्रामध्ये माता सभा घेण्यात याव्यात अशा स्पष्ट सुचना वरिष्ठ स्तरावरून सर्व अंगणवाडी सेविका/मदतनीस यांना देण्यात आल्या आहेत.१ ते १५ जुलै २४ या कालावधी गावातील कोणतीही २१ ते ६० वयोगटातील पात्र असणारी महिला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ” वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका/मदतनीस यांनी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

काही शंका/अडचण असल्यास

आपल्या तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच आपल्या बीटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याशी संपर्क साधावा.

Comment here